Breaking
ब्रेकिंग

प्रदूषण टाळा, आरोग्य सांभाळा

0 9 1 0 9 1

प्रदूषण टाळा, आरोग्य सांभाळा
===================

प्रदूषण ही आजची सर्वात मोठी समस्या आहे.
हवा, पाणी, माती सगळीकडे प्रदूषण वाढले आहे.
गाड्यांचा धूर आणि कारखान्यांचा धूर हवा खराब करतो.
दूषित हवेमुळे दमा, खोकला, फुफ्फुसाचे आजार होतात.
म्हणून प्रदूषण टाळणे ही काळाची गरज आहे.
नदी-नाल्यात कचरा टाकल्याने पाणी दूषित होते.
अशुद्ध पाण्याने पोटाचे विकार आणि ताप होतो.
प्लास्टिकमुळे माती खराब होते, प्लास्टिक कुजत नाही.
मोठ्या आवाजामुळे झोप आणि मेंदूवर परिणाम होतो.
म्हणून कचरा योग्य ठिकाणीच टाकला पाहिजे.
झाडे लावणे हाच प्रदूषणावरचा खरा उपाय आहे.
झाडे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात.
जवळचे काम पायी किंवा सायकलने करावे.
कापडी पिशवी वापरावी, प्लास्टिक टाळावे.
पाणी वाया घालवू नये, पाणी हेच जीवन आहे
घर, अंगण, परिसर स्वच्छ ठेवावा.
ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा.
फटाक्यांचा वापर कमी करून हवा वाचवावी.
गाड्यांची वेळेवर तपासणी करून धूर कमी करावा.
स्वच्छ वातावरणातच मन प्रसन्न राहते.
रोज व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप घ्यावी.
लहान मुलांना स्वच्छतेची सवय लहानपणापासून लावावी.
आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल.
चला, आजच संकल्प करूया, प्रदूषण टाळूया.
कारण निरोगी शरीर हेच खरे धन आहे.

– ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर
भ्रमण ध्वनी = ९६०४७९७३१६

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 0 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे