Breaking
ब्रेकिंग

चोरीच्या गुन्हातील आरोपीस मा.न्यायालयाने सुनावली तीन दिवस पोलीस कस्टडी

0 7 6 9 4 9

चोरीच्या गुन्हातील आरोपीस मा.न्यायालयाने सुनावली तीन दिवस पोलीस कस्टडी

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत ब्राह्मणी गावातून फिर्यादी अजिंक्य जालिंदर शिरसाठ राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी यांच्या घरासमोरून स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर एम एच 17 सी वाय 23 37 ही चोरून नेल्याची फिर्याद प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1080/2025 बीएनएस कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करून मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने ब्राह्मणी येथे आरोपी नामे अशोक रखमाजीत पिंपळे राहणार मानोरी तालुका राहुरी यास सदर गुन्ह्यातील चोरून नेलेल्या मोटरसायकल सह सिताफिने पकडून त्यास सदर गुन्ह्यात दिनांक 5/10/2025 रोजी अटक करून त्यास माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय राठोड हे करीत आहे
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे.सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर सर यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ Hc संजय राठोड. सफौ बबन राठोड .Hc अशोक झिने. पोना सुनील निकम. पोना गणेश सानप pc सचिन ठोंबरे Pc अंकुश भोसले Pc कुऱ्हाडे यांनी केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे