Breaking
ब्रेकिंग

दहिगाव योजनेतील हक्काच्या पाण्यासाठी शेलगाव क ग्रामस्थ आक्रमक; २४ गावांच्या समन्याय पाणी वाटपासाठी निवेदन

0 8 9 6 7 5

दहिगाव योजनेतील हक्काच्या पाण्यासाठी शेलगाव क ग्रामस्थ आक्रमक; २४ गावांच्या समन्याय पाणी वाटपासाठी निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १९/ दहिगाव उपसा सिंचन योजनेतील २४ गावांना प्राधान्याने पाणी मिळावे, या मागणीसाठी शेलगाव (क.) ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. योजनेबाहेरील गावांना पाणी देण्यास विरोध नसून, प्रथम लाभक्षेत्रातील गावांची गरज भागवून शिल्लक पाण्याचे वाटप करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेलगाव क ला मागील वर्षी उन्हाळी आवर्तन मिळाले नाही, तसेच यावर्षीही खरीप आवर्तनाचे पाणी मिळाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याने दहिगाव योजनेच्या कालव्यातून तातडीने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित कालवा अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांनाही निवेदन पाठविले आहे.

यावेळी माजी सरपंच आत्माराम वीर, पोलीस पाटील श्रीधर पाटील, माजी सरपंच अंकुश जाधव, सुरेश शिंदे गुरुजी, सरपंच राहुल कुकडे, उपसरपंच सचिन वीर यांच्यासह अनिकेत शिंदे, अमर शिंदे, प्रज्वल माने, अनिकेत माने, रोहित वीर, दत्तात्रय बनसोडे, अरुण काटुळे, राजाराम वीर, रोहित वीर, अण्णा वीर, डॉ. विकास वीर, दत्तात्रय वीर, विकास बनसोडे आदी उपस्थित होते.

“२४ गावांच्या हक्काचे पाणी प्रथम द्या; त्यानंतरच शिल्लक पाण्याचे वाटप करा,” अशी ठाम मागणी शेलगाव क ग्रामस्थांनी केली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे