निर्मलनगर परिसरातील २ रस्त्यांचे गोपीनाथ मुंढे मार्ग व रुक्मिणी काळे आज्जी मार्ग नामकरण रविवारी होणार

निर्मलनगर परिसरातील २ रस्त्यांचे गोपीनाथ मुंढे मार्ग व रुक्मिणी काळे आज्जी मार्ग नामकरण रविवारी होणार
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
नगर-अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग २ मधील निर्मलनगर भागातील डॉ.पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एसटीडी पर्यतच्या मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील भगवान बाबा अपार्टमेंट ते रोहन रेसिडेन्सी या अंतर्गत रस्त्याचे स्व.रुक्मिणीबाई काळे आज्जी मार्ग नामकरण समारंभ चैत्रपाडवा,रविवार, दि.३० मार्चरोजी, संध्या ५ वा.आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक निखिल वारे व भाजपाचे जेष्ठ नेते गोकुळ काळे यांनी दिली .
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,नानासाहेब जाधव(प्रांत संघचालक पश्चिम महाराष्ट्र प्रांत),आ.संग्रामभैय्या जगताप यांच्या शुभहस्ते हे नामकरण होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे यशवंत डांगे(आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका),अभय आगरकर(भाजपा शहरजिल्हाध्यक्ष) तसेच प्रमुख उपस्थिती संपत बारस्कर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस),बाबूशेठ टायरवाले(जिल्हाप्रमुख शिवसेना),नगरसेविका संध्याताई पवार,विनीत पाऊलबुद्धे,सुनील त्र्यंबके,रामदास आंधळे व रुपाली वारे,सचिन पारखी(सरचिटणीस भाजपा),बाबासाहेब सानप(भाजपा नेते)उपस्थित राहणार आहे .
स्व.गोपीनाथजी मुंडे यांचे कार्य सर्वाना माहित आहे,तळागाळातील लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले तर रुक्मिणी काळे आज्जी या धार्मिक सामाजिक क्षेत्रात काम करत होत्या,रुक्मिणी बाई काळे आज्जी तेलीखुंटावर राहत असतांना लंगर बिडी,भिकुसा बिडी मधील बिडी कामगार काम करताना त्याच्यासाठी रामायण,महाभारत,ज्ञानेश्वरी चे वाचन करुन अर्थ सांगत असत. त्यामुळे महिला बिडी कामगारांचा कामाचा स्पीड वाढत होता व परमेश्वराच्या नामस्मरणाचा लाभही होत होता. यासाठी त्या कुठलाही मोबदला घेत नसत. हेच व्रत निर्मल नगरला आल्यावरही चालु राहीले. हनुमान मंदिरात पोथी वाचन व भजन सुरु केले. येथील महिलांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण केली. परीसरात त्या काळे आज्जी म्हणून सर्व परीचीत होत्या.
तरी नामफलक अनावरण समारंभासाठी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन निखिल वारे,गोकुळ काळे भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना महायुती पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते तसेच प्रभाग क्र.२ मधील सर्व मान्यवर नागरिक व बंधू भगिनी यांनी केले आहे