शुक्रवारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा सत्कार समारंभ

शुक्रवारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा सत्कार समारंभ
करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी)
करमाळा तालुक्याचे माजी आमदार तथा सोलापूर जिल्ह्याच्या जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप
यांनी संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेऊन, शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्याबद्दल शिवसेना व सर्व पदाधिकारी व तालुक्यातील जगताप गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शुक्रवारी 13 जून रोजी दुपारी 01.00 वाजता मार्केट कमिटी मध्ये जयवंतराव जगताप यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तालुक्यातील कार्यकर्ते, जनता युवक यांनी या सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीच्या तोंडावर जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे पाठोपाठ चाळीस ते पन्नास वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जगताप गट शिवसेनेत सामील झाल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊन सर्व ताकद देण्याचा शब्द दिला आहे. तर जगताप यांनी सर्व निवडणूक धनुष्यबाणावर लढवणार असल्याची जाहीर करून, शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे उद्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना जयवंतराव जगताप काय बोलणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.