सोशल मीडिया मुळे रामप्रकाश चौधरीची कुटुंबाशी भेट
सोशल मीडिया मुळे रामप्रकाश चौधरीची कुटुंबाशी भेट
अहिल्यानगर / प्रतिनिधी:-(शिवाजी दवणे)
अलिकडच्या काळात प्रत्येक हातात एक मोबाईल हा दिसतोच पण हा मोबाईल मध्ये आपण काय करतो यांचा उपयोग कोण कसा कसा करतो हे अनेकांना अनुभव आला आहे येत आहे.सोशल मीडियाचा योग्य वापर योग्य केला तर चांगले काम कार्य होऊ शकते. कोल्हापूर येथील एक हमाली करणारा एक युवक क्लासेस न लावता युट्युब वर उपलब्ध असलेले व्हिडिओ क्लासेस आणि सोशल मीडिया वरील माहिती वर अधिकारी झाला बातम्या द्वारे आपण वाचले असेल कदाचित नुकताच यांचा एक चांगला अनुभव आला. पुणे येथील एक कुटुंब देवदर्शन करून रेल्वेने पुणे कडे चाललं होते राहुरी येथील पुणतांबा या स्थानकांवर रेल्वे थांबा घेतला आणि चौधरी कुटुंबातील मानसिक स्वास्थ्य थोडेसे व्यवस्था नसलेले रामप्रकाश चौधरी हे या स्थानकांवर नजरचुकीने मिंसिंग झाले. सदर चौधरी कुटुंबाचा हा प्रकार अहिल्यानगर स्थानकांवर रेल्वे थांबा घेतल्यानंतर त्यांना हि गोष्ट लक्षात आली आणि आपला कुटुंबातील एक सदस्य नाही ते हे व्यथित झाले. त्यांनी खाजगी वाहनाने पुन्हा पुणतांबा रेल्वे स्थानक गाठले पण रामप्रकाश चौधरी हे काय त्या ठिकाणी आढळुन आले नाही.सर्व ठिक ठिकाणी त्यांनी शोधमोहीम राबवली पण ते काय आढळून आले नाही. राहुरी पोलिसा कडे त्यांनी सदर घटना हकीगत सांगितली परंतु हा प्रश्न हा विषय तो रेल्वे पोलिस अंतर्गत येतो आपण शेवटी त्यांनी अहिल्यानगर रेल्वे पोलिस स्थानकांत रामप्रकाश चौधरी मिसिंग गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे येथील कुटुंबातील सोशल मीडिया वर मैत्री असलेले पत्रकार शिवा म्हस्के यांची या कुटुंबातील एक नातेवाईक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांचा मोबाईल नंबर संपर्क करून सदर घटना सांगितली त्यानंतर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांनी आपल्या संपर्कातील पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते यांना सदर घटना कल्पना व एक मेसेज फोटो तयार करून पत्रकार शिवाजी दवणे, सामाजिक कार्यकर्ते , पोलिस दलातील मित्र , सामाजिक संघटना सदर मेसेज राहुरी श्रीरामपूर अहिल्यानगर शहरात सोशल मीडिया प्रसारित करण्यात आला आणि हा सोशल मीडिया नाव संपर्क क्रमांक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते नाव असल्याने हे नाव परिचित असल्याने हा मेसेज खोटा किंवा अफवा नाही त्यामुळे खात्री मुळे हा मेसेज राहुरी आणि अहिल्यानगर शहरात सोशल मीडिया ग्रुप वर मोठ्या प्रमाणावर व्हायरस झाला आणि हा प्रसारित वर्णन व्यक्त अहिल्या नगर शहरात काही सामाजिक कार्यकर्ते आढळली त्यांनी तात्काळ जवळचे पोलिस स्थानकात त्यांना प्रेमाणे नेऊन त्यांना जेवण कपडे दिले व सदर चौधरी कुटुंबाशी संपर्क करून सदर पुणे येथील चौधरी कुटुंब तात्काळ अहिल्यानगर शहरात दाखल झाले त्यांच्या राम प्रकाश चौधरी समोर व्यवस्थित पाहुण आनंद अश्रू अनावर झाले आणि त्यांनी पत्रकार शिवा म्हस्के,व पत्रकार शिवाजी दवणे यांना खुप खुप धन्यवाद आभार मानले खरंच आपण आपण करत असलेले कार्य आम्ही सोशल मीडिया वर आज पर्यंत नुसतं पाहत होतो आम्हाला स्वप्न सुध्दा वाटल नाही की आपलं हे सामाजिक कार्य आमच्या एक दिवस कामाला येईल त्यानं हे सामाजिक कार्य सोशल मीडिया योग्य वापर अनुभव आला त्यांनी सर्वांचे धन्यवाद आभार मानुस पुणे कडे मार्गस्थ झाले तो आनंद क्षण आणि भावनिक क्षण प्रत्येकांनी आपल्या हातुन चांगलं कार्य घडल्याचे समाधान घेऊन आप आपल्या घराकडे मार्गस्थ झाले.
हि सोशल मीडिया ताकद योग्य वापर करावा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शिवा म्हस्के यांनी केले.


