Breaking
ब्रेकिंग

आजचा भारतीय उद्योग टाटा यांच्या योगदानातून

0 8 6 6 6 2

आजचा भारतीय उद्योग टाटा यांच्या योगदानातून

प्रतिनिधी : संवेद वायकर

अ.नगर – न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथील बीबीए व बीबीए (आय. बी) विभागाने भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांची एकशे एकविसावी जयंती दरवर्षीप्रमाणे २९ जुलै रोजी साजरी केली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमोल घोलप – अधिसभा सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अध्यक्ष निखिल उद्योग समूह अ.नगर, डॉ. रघुनाथ सातपुते सीनियर मॅनेजर स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अ. नगर, विभाग प्रमुख प्रा.डॉ. मंगेश वाघमारे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे हे होते.
प्रमुख पाहुणे अमोल घोलप यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभा करून तो समाजाला उपयोगी कसा पडेल यासंबंधी मार्गदर्शन केले. छोट्या छोट्या कृतीतून नवीन संकल्पना अमलात आणाव्यात, कोणतेही काम मनापासून केले तर यश नक्कीच मिळते, सर्व विद्यार्थ्यांनी जे. आर. डी. टाटा यांचे आत्मचरित्र जरूर वाचावे असे आवाहन केले. प्रमुख वक्ते डॉ. रघुनाथ सातपुते यांनी विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन, मनन करण्यास सांगितले. उद्योग केवळ नफा मिळविण्यासाठी नव्हे तर समाजाच्या विकासासाठी उपयोगी आला पाहिजे हे जे. आर. डी. टाटांची तत्त्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आणावी, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून भावी आयुष्यात वाटचाल करावी असे विद्यार्थ्यांना आव्हान केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी संस्थेची विचारधारा जे. आर. डी यांच्या विचारांशी जुळते, तसेच विद्यार्थ्यांनी वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी या तत्त्वांचा प्रगतीसाठी सुंदर ताळमेळ साधता येतो असे नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंगेश वाघमारे यांनी केले. यात त्यांनी भारतीय उद्योगाचे जनक श्री जमशेदजी टाटा, भारतरत्न जे. आर. डी टाटा व श्री रतन टाटा यांच्या जीवन कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच त्यांनी भारतीय उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी केलेल्या विशेष योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानिमित्त विभागामध्ये नुकतेच भारतरत्न जे. आर. डी टाटा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा कासार (तृतीय वर्ष बी.बी.ए), तसेच पाहुण्यांचे स्वागत व परिचय सुमित पुरोहित व अक्षता आढाव यांनी केला. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रूपाली मिस्किन यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ. सतीश जगताप, प्रा.डॉ. राहुल थोरात, प्रा.अभिजीत सातभाई, प्रा.अनिता पेटकर, प्रा. शामल जाधव, प्रा. नम्रता ठाकर तसेच बीबीए व बीबीए (आयबी) विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( उद्योजक तसेच पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री अमोल घोलप बीबीए व बीबीए (आयबी) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, समवेत प्राचार्य डॉ बाळासाहेब सागडे, बीबीए विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंगेश वाघमारे, डॉ. रघुनाथ सातपुते सीनियर मॅनेजर स्नाईडर व प्रा. डॉ. सतीश जगताप. )

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे