अनुष्काने राज्यस्तरीय यशाने शाळेचा नावलौकिक वाढवला – डॉ. उद्धव शिंदे
अनुष्काने राज्यस्तरीय यशाने शाळेचा नावलौकिक वाढवला – डॉ. उद्धव शिंदे
‘स्नेहबंध’ तर्फे अनुष्का साठेचा गौरव
अहिल्यानगर – मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथे झालेल्या महाअंतिम फेरीत एकल गीत गायन स्पर्धेत छावणी परिषदेच्या पीएमश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेची विद्यार्थिनी अनुष्का साठे हिने जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत ५६ स्पर्धकांमधून उत्तम क्रमांक मिळवला. तिला ‘एकल लहान कलाकार उत्तम सादरीकरण’ हा विशेष पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल अनुष्का हिचा स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.
याप्रसंगी स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे म्हणाले, “राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहें. स्नेहबंध फौंडेशन तर्फे अनुष्का साठे हिला अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मान केला. यावेळी छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, शोभाताई भंडारी, रुपेश भंडारी, सचिन पेंडुरकर, स्नेहल लवांडे आदी उपस्थित होते.
अनुष्काला अहिल्यानगर नाट्यशाखेचे प्रसाद भनगे, शैलेश देशमुख, शाळेच्या शिक्षिका स्नेहल लवांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक संजय शिंदे, शिक्षक संजय हजारे व मनिषा साठे यांचे सहकार्य मिळाले. वाद्यवृंद साथसंगत आदिनाथ वाघमारे व हर्षल गायकवाड यांनी दिली.


