Breaking
ब्रेकिंग

पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने वृक्षारोपण करावे… प्रमोद दादा मोरे

0 8 6 5 2 1

पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने वृक्षारोपण करावे… प्रमोद दादा मोरे

(श्रीरामपूर येथे पर्यावरण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न)

राहुरी तालुका / प्रतिनिधी : जावेद शेख

पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्यास व वृक्ष संवर्धनाचे काम नैसर्गिकरित्या व्यवस्थित होते त्यामुळे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने झाडे लावून वृक्षारोपण करावे असे प्रतिपादन श्रीरामपूर आगार येथे वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांनी केले. मंगळवार दि. ७ जुलै रोजी एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त “७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प” या उपक्रमाअंतर्गत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, श्रीरामपूर आगार तसेच प्रवासी संघटना, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त समाजाची निर्मिती आणि हरित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी राज्यभर ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा केली.

यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष मा. प्रमोददादा मोरे, राज्य उपाध्यक्ष प्रा डॉ. अनिल लोखंडे सर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, श्रीरामपूर आगार प्रमुख अनिल बेहेरे, प्रवासी संघटनेचे किशोर फुणगे, दत्तात्रय काशीद, राजेंद्र भांबारे,कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, कार्याध्यक्ष निर्मलाताई मस्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षा राजश्री जाधव, शोभाताई काळे,आदर्श सरपंच श्री. बाळासाहेब ढोले,जिल्हा संघटक अर्जुन राऊत,राज्य संघटक श्री. बाळासाहेब गाडेकर, राज्य मीडिया प्रमुख प्रा.चंद्रकांत भोजने, श्री आनंदा झरेकर, हरिभाऊ शिंदे निवेदक सोपान वायाळ, सौ.मीनाक्षीताई मोरे,सौ. वंदनाताई भोजने,सौ.स्वाती वायळ, वैष्णवी मोरे,तसेच एसटी अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे सांगून, ऑक्सिजन देणारे जास्तीत जास्त झाडांचे वृक्षारोपण करावे तसेच समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास

पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी सदस्य,श्रीरामपूर आगाराचे अधिकारी, कर्मचारी, पर्यावरण प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे