यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रकाचे उद्घाटन

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रकाचे उद्घाटन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ११/ शुक्रवार दि. ११/९/२०२६ रोजी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयात भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. माने सर हे होते. त्यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की अशा उपक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढते त्यामुळे असे उपक्रम प्रत्येक विभागाने करणे गरजेचे आहे व विद्यार्थ्यांच्या कृतीला चालना देणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे, डॉ. अंकुश करपे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजया गायकवाड, मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपडे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. विष्णु शिंदे, प्रा. प्रमोद शेटे, डॉ. ज्ञानेश्वर सुपेकर प्रा. गौतम खरात, कार्यालयीन प्रमुख श्री. विजयसिंह साळुंखे, सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रगती देवकर हिने तर आभार प्रदर्शन कु. सलमा पठाण यांनी केले.


