छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान शिबिरात 641 जणांचे समाधान

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान शिबिरात 641 जणांचे समाधान
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत नगांव मंडळात शिबिरात 641 जणांचे समाधान करण्यात आले .
नगाव बु तसेच देवळी, देवगांव, धूपी, गडखांब, कचरे, मांजडर्डी, नगांव खु., गांधली, पिळोदा, नंदगांव, लाडगांव, आमोदा, तासखेडा, दरेगांव, दहिवद, दहिवद खु. या गावातील नागरिकांसाठी शिबिर घेण्यात आले. शिबीराचे उदघाटन जि. प. च्या माजी सदस्या जयश्री पाटील यांचे हस्ते करण्यात आले. शिबीरात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, उप अधिक्षक भूमि अभिलेख स्मिता गावित तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे/समस्यांचे निराकरण करुन वंचित लाभार्थीना जयश्री पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र/धनादेशाचे वाटप करण्यात आले. सुत्र संचालन पोलीस पाटील प्रविण गोसावी तर आभार नायब तहसीलदार प्रशांत धमके यांनी मानले.
सदर शिबिरात पुरवठा शाखा तर्फे 41 नवीन व दुबार शिधापत्रिका देण्यात आल्या.संगायो शाखा तर्फे 131 डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणुक शाखेतर्फे 11-नवीन लाभार्थी यांचे अर्ज भरुन घेण्यात आले.9 नवीन मतदारांकडून नमुना 6 भरुन घेण्यात आला.सेतु शाखा तर्फे 124 उत्पन्नाचे दाखले,38 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, 38 रहिवासी प्रमाणपत्र,11 जातीचे दाखले,37 आधार नोंदणी व 149 आधार दुरुस्ती करण्यात आली.अॅग्रोस्टॅग प्रमाणपत्र 12 शेतकरी यांना वाटप करण्यात आले.
उप अधिक्षक भूमि अभिलेख तर्फे 9 सनद वाटप, पंचायत समिती तर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेतून 7 जलतारा प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.तुकडा नोंद कमी करुन दुरुस्त 7/12 उतारा वाटप करण्यात आले. नवीन नोंदी घेवून दुरुस्त 7/12 उता-यांचे वाटप व आधार उद्योम प्रमाणपत्र नागरीकांना देण्यात आले .