नगर पुणे महामार्गावर चास शिवारात गॅस टँकरला अपघात…
महामार्ग पोलीसांच्या तात्काळ कारवाईने वाहतुक सुरळीत. . .
जिल्हा प्रतिनिधी : रफिक शेख
दि . ९ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान महामार्ग पोलीस केंद्र नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते नगर लेन चास शिवारात गॅस टँकर क्रमांक एम.एच. ४८ ए.वाय. ४४३५ हा पुण्याकडून अहिल्यानगरकडे येत असताना वाहन चालकाचे टॅंकरवरील नियंत्रण सुटल्याने टॅंकर डिव्हायडरला धडकून पलटी झाला .
यावेळी अपघातामध्ये कोणीही जखमी नाही. परंतु सदर गॅस टँकर महामार्गावर आडवा पलटी झाल्याने काही काळ वाहतुक कोंडी झाली. महामार्ग पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्वरीत कारवाई केली. व सदर गॅस टँकर चार क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला. व वाहतूक पोलीकडून वाहतुक कोंडी दूर करत महार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली.
यावेळी अपघातस्थळी एपीआय.विराज गिरे , पी.एस.आय. भालसिंग, ए.एस.आय.कोडम, हेड कॉन्स्टेबल फसले , हेड कॉन्स्टेबल मुळे, हेड कॉन्स्टेबल पालवे, पोलीस कॉन्स्टेबल वाघ,, पोलीस कॉन्स्टेबट घावटे, पोलीस कॉन्स्टेबल इधाटे, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर, यांनी अपघात स्थळी पोहचून तात्काळ कारवाई करत नगर पुणे महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.