Breaking
ब्रेकिंग

सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यशाची गुरुकिल्ली – डॉ. उद्धव शिंदे”

0 8 6 5 1 6

“सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यशाची गुरुकिल्ली – डॉ. उद्धव शिंदे”

दहावी बोर्ड परीक्षार्थींना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा

अहिल्यानगर : भिंगार येथील रयत शिक्षण संस्था संचलित श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दहावी बोर्डाच्या परीक्षेस प्रारंभ होत असताना विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
या प्रसंगी सहा. विभागीय अधिकारी तथा प्राचार्य प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुले, पर्यवेक्षिका कविता शिंदे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
दहावी बोर्ड परीक्षेसाठी शाळेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक लावणे आदी सर्व आवश्यक तयारी योग्यरीत्या केल्याचे दिसून आले.

यावेळी डॉ. शिंदे म्हणाले, “दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी आहे. आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक विचार ठेऊन परीक्षा दिल्यास यश निश्चित मिळते. कोणताही ताण न घेता शांतपणे व नियोजनबद्ध अभ्यासावर विश्वास ठेवा.”

फोटो ओळ:
भिंगार येथील श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे दहावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देताना ‘स्नेहबंध’चे संस्थापक डॉ. उद्धव शिंदे. सोबत प्राचार्य प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुले, पर्यवेक्षिका कविता शिंदे व शिक्षकवृंद.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे