Breaking
ब्रेकिंग

इयत्ता ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुसूत्रतेसाठी अकोले तालुका समितीची बैठक संपन्न*

अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी व प्राचार्य, तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित*

0 3 9 0 4 0

*इयत्ता ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुसूत्रतेसाठी अकोले तालुका समितीची बैठक संपन्न*

*अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी व प्राचार्य, तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित*

राहुरी तालुका जावेद शेख

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने २५ फेब्रुवारी २०२५ व ०६ मे २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केल्याप्रमाणे अंमलबजावणी अकोले तालुक्यातील सुरू आहे यासाठी अकोले पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तालुका समितीचे अध्यक्ष अरविंद कुमावत व समितीच्या सचिव विस्तार अधिकारी सविता कचरे, विषय तज्ञ महेश पाडेकर, सदस्य प्राचार्य गणपत धुमाळ, तंत्रस्नेही शिक्षक चंद्रशेखर हासे, अकोले महाविद्यालयातील उपप्राचार्य चांगदेव डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले महाविद्यालयात के. बी. दादा सभागृहात सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील सर्व प्राचार्य, नोडल शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते यावेळी प्रत्यक्ष केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती विस्तार अधिकारी सविता कचरे, समिती सदस्य विषय तज्ञ महेश पाडेकर, समिती सदस्य चंद्रशेखर हासे यांनी दिली यावेळी विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यास सांगितले तसेच प्रवेश प्रक्रिया संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा, इन हाऊस कोटा, विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चिती केल्यानंतर करावयाची कार्यवाही, विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यानंतर करावयाची कार्यवाही, कॉलेज निवड करणे, याविषयी सविस्तर मुद्दे निहाय माहिती दिली सविचार सभेच्या अध्यक्षस्थानी अकोले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत हे होते त्यांनी अध्यक्ष भाषणात शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया होईल, विद्यार्थी व पालक यांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे ही ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी नवीन आहे यासाठी समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याच्या सूचना अरविंद कुमावत यांनी दिल्या शासनाच्या सर्व सूचना आल्यानंतर त्या वेळोवेळी सर्व नोडल शिक्षक, प्राचार्य तंत्रस्नेही शिक्षकांना दिल्या जातील व दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ही करावी व दररोजची आकडेवारी ही पंचायत समिती अकोले यांच्याकडे द्यावी यावेळी समितीच्या सचिव विस्तार अधिकारी सविता कचरे यांनी अकोले तालुक्यातील सर्व प्रवेश प्रक्रिया ही सुरळीत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी अकोले तालुक्यातील सर्व उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य नोडल शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाडेकर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे