Breaking
ब्रेकिंग

संविधान ग्रुप निर्मलनगरच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

गुड्डू कांबळेंच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन संपन्न

0 7 6 9 4 3

संविधान ग्रुप निर्मलनगरच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

गुड्डू कांबळेंच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन संपन्न

प्रतिनिधी : संवेद वायकर

निर्मलनगर मुळे एसटीडी चौक येथील संविधान ग्रुपच्या वतीने मा .नगरसेवक सुनिलजी त्र्यंबके यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी अनोख्या पद्धतीने शिवजयंती  मोठ्या उत्साहात साजरी  करण्यात आली . यावेळी तरुण युवकांच्या “जय भवानी, जय शिवाजी ” या जयघोषाने परिसर दणाणून गेला .
संविधान ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते गुड्डु कांबळे यांच्या वतीने शिवजयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . यावेळी संपूर्ण परिसरातील नागरिक महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . 

शिवजयंती हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून, १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाचा गौरव करणारा हा दिवस आहे . जो शौर्य, सुशासन आणि राष्ट्रप्रेमाची आठवण करून देतो. रयतेचा राजा, आदर्श व्यवस्थापन आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली जाते .
शिवाजी महाराजांनी त्या काळात अन्यायी राजवटींना झुगारून ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. त्यांनी गडकिल्ले बांधले, आरमार उभे केले आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी कडक कायदे बनवले .शिवजयंतीच्या दिवशी तरुण पिढीला त्यांच्या विचारांची, नीतिमत्तेची आणि शौर्याची ओळख करून दिली जाते. “जय भवानी, जय शिवाजी ” हा जयघोष करत, महाराष्ट्राच्या या महापुरुषाला कृतज्ञतापूर्वक नमन केले जाते .

यावेळी संविधान ग्रुपचे क्रिश उल्हारे, अक्षय रोमन, निखिल कुदळे, संकेत कपिले, गणेश कांबळे, शुभम कांबळे, अक्षय कांबळे ,अनुज जगताप , अभिषेक पवार , विराज गंगावणे, यश पारखे , रोहित करोलिया, आकाश करोलिया, व्हिकी करोलिया , गोट्या भिंगारदिवे , स्वप्नील जाधव , प्रकाश शिंदे , सोमनाथ गिते , अशोक गिते या युवकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे