डायव्हर्शनरोडचा खड्डा बुजवायला महिना लागला*
काँग्रेसचे आंदोलन फत्ते, वाहतुक पूर्ववत झाली सुरु*

*डायव्हर्शनरोडचा खड्डा बुजवायला महिना लागला*
*काँग्रेसचे आंदोलन फत्ते, वाहतुक पूर्ववत झाली सुरु*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर येथील नाट्यगृहाच्या समोरुन जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या वळण रस्त्यावर जुना गलवाडेरोडला जोडणाऱ्या टर्नवर वारंवार खड्डा पडत होता. दुरुस्तीही होत होती पण ती दुरुस्ती तकलादू ठरत असे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ह्या खड्डयात वृक्षारोपण करीत १८मे २५ रोजी सकाळी आंदोलन केले.
टिकावू स्वरुपाचा हा खड्डा बुजवावा अशी त्यांची मागणी होती. या रस्त्यावर सा.बां. चे नियंत्रण आहे. त्यांनी संबंधित कंत्राटदाराकडून काँक्रेटीकरणाने हा खड्डा दुरुस्त केला. आता या वळण रस्त्याची वाहतुक सुरळीत झाली आहे. अशा प्रकारे काँग्रेसच्या त्या आंदोलनाला सफल व्हायला महिना लागला आहे.
काँग्रेसच्या त्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, अमळनेर तालुकाध्यक्ष बी. के. सुर्यवंशी व शहराध्यक्ष मनोज बी. पाटील यांनी केले होते.या आंदोलनात गजेंद्र साळुंखे, शरद पाटील, प्रताप नगराज पाटील, दिलीप पाटील, पी. वाय. पाटील, बन्सिलाल भागवत, के.व्ही. पाटील,भगवान संदानशिव व तुषार संदानशिव, विठ्ठल पवार, शुभम निकम, गोपाळ बडगुजर आदि कार्यकर्ते सहभागी झालेले होते. काँग्रेसचे हे स्थानिक आंदोलन तब्बल महिन्याभराने लेट पण थेट फत्ते झाले आहे.
अशात मात्र प्रताप मिल कॉलनीतील रहिवाशांना तब्बल महिनाभर चिंचोळ्या, छोट्याशा रस्त्याने ट्रॅफिक वळविल्याचा जड वाहनांचा हकनाक त्रास सहन करावा लागला. या छोट्या रस्त्याची अतिरिक्त ट्रॅफिकची ददात मिटल्याने मिल कॉलनीतील रहिवाशांनी तुर्तास सुटकेचा निश्वास सोडला आहे.