बळवंत वालेकर रौप्यमहोत्सवी स्मरणिकेच्या संपादकपदी
बळवंत वालेकर रौप्यमहोत्सवी स्मरणिकेच्या संपादकपदी
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, “कुलाबावैभव” संपादक बळवंत वालेकर यांची कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सेवानिव्रुत्त मुख्याध्यापक मंचने पोयनाड
(पाँडवादेवी ) येथे आयोजिलेल्या रौप्यमहोत्सवी स्नेहमेळाव्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेच्या संपादकपदी निवड केली आहे. या मंचाचे १५२ सदस्य असून सेवानिव्रुत्त मुख्याध्यापक सध्या कोकण , पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ व मराठवाड्यात राहतात .जुन्या सहका-यांच्या भेटीसाठी मेळाव्यास येणारच. सदर (रौप्यमहोत्सवी ) स्नेहमेळावा रविवार दि, 1२ जानेवारी २०२५ रोजी होईल.
गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत प्रथमच स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे. यावर्षी रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा असल्यामुळे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन समन्वयक के. डी. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. या स्नेहमेळाव्याची व स्मरणिकेच्या प्रकाशनाची तयारी जोरात सुरू आहे.