“हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र “या अभियानांतर्गत करमाळा बाजार समितीमध्ये वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ
*”हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र “या अभियानांतर्गत करमाळा बाजार समितीमध्ये वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ
करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी)
महाराष्ट्राचे मा .मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देशास अनुसरून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये” हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत वृक्ष लागवडीचा शुभारंभ करमाळा बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला .यावेळी बोलताना माजी आमदार जगताप यांनी सांगितले की,राष्ट्रीय वन नीती प्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राचे ३३ % क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे . सद्यस्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण २१ .२५ टक्के आहे .राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी” हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत वर्ष २०२५ करिता वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्याचा निर्णय राज्याचे मा .मुख्यमंत्री यांनी घेतला आहे .राज्यातील बाजार समित्यांना महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळांने वृक्ष लागवडीच्या दिलेल्या उद्दिष्टास अनुसरून व जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार करमाळा बाजार समितीच्या आवारामध्ये दीडशे वृक्षांच्या लागवडीचा व सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला .वृक्ष लागवडीनंतर संगोपनाचे नियोजनांमध्ये बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारा अंतर्गत येणाऱ्या आडते – व्यापारी यांचेसह गाळेधारक ,हमाल- तोलार, कर्मचारीआदी घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती माजी आमदार जगताप यांनी याप्रसंगी केले . यावेळी प्रथम विशेष लेखापरीक्षक श्री सुनील काळे,बाजार समितीचे संचालक जनार्धन नलवडे,मनोज पितळे ,परेश दोशी,माजी संचालक मयूर दोशी , व्यापारी विक्रांत मंडलेचा,खरेदी -विक्री संघाचे संचालक बबनराव मेहेर,शहाजी शिंगटे,अमोल परदेशी,युसुफ शेख ,दत्तात्रय भागडे, दिगंबर रासकर,वृक्षमित्र किरण दुरगुडे आदीं सह शेतकरी ,व्यापारी व कर्मचारी उपस्थित होते . उपस्थितांचेआभार बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले .



