Breaking
ब्रेकिंग

महावितरणाचा विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी ५ फेब्रुवारीला राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

रुईछत्तीसी सबस्टेशन अंतर्गत गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित ; शेती पिके पाण्याविना जळु लागले आहे

0 3 9 0 4 0

महावितरणाचा विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी ५ फेब्रुवारीला राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

रुईछत्तीसी सबस्टेशन अंतर्गत गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित ; शेती पिके पाण्याविना जळु लागले आहे. 

विशेष प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के

नगर तालुक्यातील दहिगाव, साकत खुर्द, शिराढोण, वाटेफळ अशा अनेक गावात सध्या थ्री फेज विज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. या विज पुरवठा खंडीत होणे, चार चार तास विज पुरवठा येणे नाही. विहिरी पाणी मोटार चालू होतो नाही तर लगेच विज जात आहे. विज कमी दाबाने येत असल्याने मोटर देखील चालत नाही. विज पुरवठा कमी असल्याने पाणी मोटार जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. रोग राईने तर पिके मोठ्या प्रमाणावर बळी पडले आहे. यात पुन्हा संकट हे विज आली विज गेली शेती पाणी वाफ्यात पडत नाही तोच मोटार बंद पडत आहे. विजेचा लंपडावाने आपल्या पंचक्रोशीतील शेतकरी मेटाकुटीला आला आली विज गेली विज आली हा खेळ थांबतात थांबेना रूईछत्तीसी सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर शक्ती कमी पडते का, विज पुरवठा कमी दाबाने होतो का. अशा अनेक बाबी आहेत पण आज आपल्या शेतीला पाणी देणे आवश्यक आहे. कांदा एकरी खर्च पन्नास हजार पुढे जात आहे. बारा महिने धान्य (खाद्य) गहु शेतात पाणी वाट पाहत आहे. संत्रा फळबाग,हरभरा पाणी प्रतिक्षेत आहे. अशा विविध प्रकारच्या थ्री फेज समस्या आहेत आज पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहिने जिल्हाधिकारी अहिल्यानगर, मुख्य अभियंता महावितरण, उपविभागीय अभियंता नगर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी या निवेदन प्रति दिल्या आहेत. जर दोन दिवसांत विज पुरवठा सुरळीत न झाल्यास ५ फेब्रुवारीला दहिगाव या ठिकाणी सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे हे निवेदन महावितरण चव्हाण साहेब यांना १५० ग्रामस्थ सहिने हे निवेदन दिले आहे.

या वेळी युवा नेते दादा दरेकर , माजी सरपंच सुनिल म्हस्के, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक
जंयवत शिंदे, पाराजी माने, माजी उपसरपंच महेश म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य राहूल पोटरे,विश्वनाथ शिंदे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे