Breaking
ब्रेकिंग

त्रिदल सैनिक संघाने शासकीय सेवेत दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या यशस्वितांचा केला कौतुक सोहळा…*

गावच्या मातीतील सन्मान उर्जा देणारा, गावाची नाळ जोडून ठेवणारा सन्मान - सत्कारमुर्ती*

0 3 2 1 2 6

*त्रिदल सैनिक संघाने शासकीय सेवेत दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या यशस्वितांचा केला कौतुक सोहळा…*

*गावच्या मातीतील सन्मान उर्जा देणारा, गावाची नाळ जोडून ठेवणारा सन्मान – सत्कारमुर्ती*

वाळकी प्रतिनिधी -नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे युपीएससी या परीक्षेतील गुणवंत अधिकारी, कर्मचारी गुणगौरव सोहळा सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी मा.श्री रामदास हराळ हे होते.तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ व पोलीस उप अधीक्षक बाळासाहेब साहेबराव भापकर हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश हराळ मेजर,प्रास्ताविक मा.नारायण भापकर मेजर यांनी केले. त्रिदल सैनिक संघ स्थापन होऊन जवळपास सात वर्ष झाले असून त्रिदल सैनिक संघाने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शिक्षणाधिकारी रामदास हराळ, पो. उप अधिक्षक बाळासाहेब साहेबराव भापकर,रुक्साना शेख,
शिरीन जावेद इनामदार(प्रथम वर्ग दंडाधिकारी), सौरव रामदास हराळ ,रमेश कांतीलाल कासार,(जि.प.वित्त लेखा अधिकारी) ,यश गजानन भापकर, स्नेहा शिवाजी हराळ(एमबीबीएस), दीपक श्रीधर शिंदे( उत्कृष्ट पोलिस अधिकारी) ,शरद दशरथ जावळे,दत्तात्रय रमेश हराळ,शरद दत्तात्रय चौधरी(आरोग्य विभाग), विक्रम शहाजी भापकर,सतीश भगवंत हराळ,विकास नानासाहेब गव्हाणे,संजय जयसिंग चौधरी,किरण पुनाजी भापकर(पोलिस पदी) ,आकाश झुंबर भापकर,पूजा नवनाथ चौधरी,तुषार सुभाष कर्जुले(आरोग्य विभाग),अजय सर्जेराव कोतकर,अक्षय रमेश हराळ (मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच)सौ माया संतोष हराळ(विशेष शिक्षिका माध्यमिक शासकीय नियुक्ती),अजय नामदेव भापकर (पुणे पोलीस)श्रीमती देवकर (शिक्षिका),मुनवर मोहम्मद शेख(शिक्षिका),संभाजी दादाभाऊ कोतकर (ए एस आय पदी निवड),किरण हराळ (उपअधीक्षक भूमी अभिलेख, पारनेर),मंगल वसंत जरे (मुंबई पोलीस)भूषण भारत जावळे (कॅनॉल इन्स्पेक्टर)यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणामध्ये अनेकांनी आपले अनुभव व स्पर्धा परीक्षा कशी द्यावी या बाबत मार्गदर्शन केले.आपल्या शिकण्यातून गुणवत्ता कर्मामध्ये प्रामाणिकता, नम्रता आणि स्वप्नामध्ये गावच्या प्रगतीचा विचार तसेच भविष्यात विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वाटचाल आणि जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची तयारी दाखवणे हे गावासाठी ज्ञान भांडारांच दर्शन घडवणारे आहे तसेच गावात माजी सैनिक यांच्यासारखे शासकीय निवृत्त अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी ग्रंथालयाची निर्मिती करु असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी वामनराव जाधव,उपसरपंच कुसुमताई हराळ, विठ्ठल हराळ, अब्बास शेख,लालचंद शेख, संजय कोतकर, सुनील भापकर,अंबादास कासार,चद्रकांत निकम,सोनवणे गुरुजी,त्रिदल सैनिक संघाचे पदाधिकारी आजी-माजी तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे