Breaking
ब्रेकिंग

खेती बचाओ अभियानांतर्गत चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव ने चा पुढाकार

कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करण्याचे पशुपालकांना प्रात्यक्षिक

0 9 1 0 9 1

खेती बचाओ अभियानांतर्गत चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव ने चा पुढाकार

कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करण्याचे पशुपालकांना प्रात्यक्षिक

दहीगाव ने :  संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण करणे तसेच उपलब्ध कोरड्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविणे या उद्देशाने श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव ने यांच्या वतीने गोपाळपूर येथे ‘खेती बचाओ अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पशुपालकांना कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक देऊन शास्त्रीय पद्धतीने चारा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी विविध प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गोपाळपूर ग्रामपंचायत परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राच्या पशुधन उत्पादन विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली. या प्रक्रियेमुळे निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्याची पौष्टिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्ध चाऱ्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून चारा टंचाईच्या काळात पशुधनाचे पोषण करता येते, असे त्यांनी सांगितले. तसेच मुरघास निर्मितीचे महत्त्व, चाऱ्याची योग्य साठवणूक आणि टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे योग्य नियोजन, जनावरांचे पोषण व्यवस्थापन आणि दूध उत्पादनासह पशुधनाची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि विज्ञान केंद्राचे माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ श्री. प्रकाश बहिरट यांनी केले. याप्रसंगी श्री. सुनील त्र्यंबक ताठे यांच्यासह गोपाळपूर व परिसरातील अनेक पशुपालक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पशुपालकांना चारा टंचाईच्या काळात उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता टिकविण्यासाठी उपयुक्त तांत्रिक माहिती मिळाली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 0 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे