ब्रेकिंग
महाराष्ट्र दिनानिमित्त कवि संजय महाजन यांच्या लेखनीतून साकारली अप्रतिम सुरेख कविता
0
8
6
5
1
0
महाराष्ट्र दिनानिमित्त कवि संजय महाजन यांच्या लेखनीतून साकारली अप्रतिम सुरेख कविता .
माझा महाराष्ट्र
पुण्यभूमी महाराष्ट्र,
जिल्हे 36 आमची शान,
एकता व सलोख्यासाठी,
वाहू आम्ही प्राण…….१पुण्यभूमी वीरांची ,संतांची,
देवभूमी विठ्ठल साईबाबांची,
सुबत्ता कोयना जायकवाडीची,
परंपरा पुरोगामी महाराष्ट्राची….२शैक्षणिक व औद्योगिक धोरण,
राज्याचे विकासाचे कारण,
पोलीसदलाचा भारी दरारा,
गुंड अतिरेकी येती शरण…….३उच्चपदस्थ राज्यकर्ते,
करी विकास महाराष्ट्राचा,
साक्षरतेचे उच्च प्रमाण,
उंचवी मान राष्ट्राचा……४साडेतीन पीठे देवीची,
मांदियाळी जेष्ठ कवींची,
अहिल्या देवी, जिजाऊंची,
ही पुण्यभूमी महाराष्ट्राची…..५
0
8
6
5
1
0



