तब्बल तीस वर्षानंतर जगदंबा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
तब्बल तीस वर्षानंतर जगदंबा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
विशेष प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के
नगर / तब्बल ३० वर्षानंतर श्री जगदंबा विद्यालय शिराढोण ता.नगर येथील शैक्षणिक वर्ष ईयत्ता दहावी बॅच सन १९९४-९५ दहावीचे माजी विद्यार्थी अहिल्यानगर शहरातील हाॅटेल ईर्थ या ठिकाणी एकत्र जमले माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न झाला. या आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास सन्माननिय खांदवे सर, लांडगे मॅडम, चव्हाण मॅडम, तसेच या कार्यक्रमाला ईजि. बाबासाहेब बनकर, मेजर भरत सुर्यवंशी, भाऊसाहेब बोठे, बापू वाघमोडे, गिताराम वाघ, ज्योती काशीद, आशा साबळे, मनीषा वाघ, मंदा वाघ, अर्चना वाघ, बंडू शिंदे, अशोक खरात, अशोक लोखंडे, आदी वर्गमित्र या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खांदवे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्वा प्रथम गुरुच्या हस्ते सरस्वती मातेचे पुजन दीपप्रज्वलन करण्यात आले. तदनंतर दिवंगत मुख्याध्यापक आव्हाड सर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमात दरम्यान बाबासाहेब बनकर यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या नंतर माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी आपले शालेय आठवणींना जीवनातील घडामोडीना उजाळा दिला. १९९५ बॅच मार्फत गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्या नंतर विद्यार्थी दशा ते आज पर्यंत प्रवास वर्णन झाले .आज मितीला कोण राजकीय पदावर तर कोण शासकीय अधिकारी तर कोणी व्यावसायिक, गृहिणी असे वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले . खांदवे सर यांनी प्रत्येक विद्यार्थीबाबतचे अनुभव घटना कथन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब बनकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्योती काशीद मानले या वेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.