अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांचा ‘स्नेहबंध’ तर्फे सन्मान
अहिल्यानगर येथे शाल व पुस्तक देऊन डॉ. उद्धव शिंदे यांनी केला गौरव ; कलाक्षेत्रातील योगदानाचे केले कौतुक

अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांचा ‘स्नेहबंध’ तर्फे सन्मान
अहिल्यानगर येथे शाल व पुस्तक देऊन डॉ. उद्धव शिंदे यांनी केला गौरव ; कलाक्षेत्रातील योगदानाचे केले कौतुक
अहिल्यानगर – प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांचा अहिल्यानगर येथील हॉटेल संजोग येथे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. शिंदे यांनी कानेटकर यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार आपल्या अभिनयातून समाजातील विविध पैलू उलगडतात. कला ही समाजाला जोडणारी आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारी शक्ती आहे. कलाकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि समाजात वाचनसंस्कृती रुजविणे हा फाउंडेशनचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
उर्मिला कानेटकर यांनीही स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या भेटीदरम्यान सदिच्छापूर्ण वातावरणात संवाद झाला.


