Breaking
ब्रेकिंग

रुईछत्तीशी येथील विकासकामांना २० लाख निधी मंजूर – आमदार विक्रम पाचपुते…*

0 7 6 9 4 3

*रुईछत्तीशी येथील विकासकामांना २० लाख निधी मंजूर – आमदार विक्रम पाचपुते…*

वाळकी प्रतिनिधी: दादा आगळे

नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे विकास कामांना आमदार विक्रम पाचपुते यांनी २० लाख रुपये निधी मंजूर केला आहे.गावातील भैरवाडी येथील भैरवनाथ मंदिरा समोरील सभा मंडपासाठी १० लाख तर गावातील स्मशानभूमी साठी १० लाख रुपये निधी वर्ग करण्यात आला आहे. आमदार विक्रम पाचपुते यांना निवडणुकीत रुईछत्तीशी गावाने चांगले लीड दिले होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार असताना देखील त्यांनी अनेक विकास कामांना निधी दिला होता.विक्रम पाचपुते यांनी देखील गावासाठी निधी मंजूर केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.आगामी काळात देखील अनेक विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देखील आमदार विक्रम पाचपुते यांनी दिले आहे.गावात रस्ते , पाणी , इतर भौतिक सुविधा यासाठी आगामी काळात मोठा निधी मिळणार आहे त्यात गावासाठी पुन्हा भरीव निधी मंजूर करून देणार असेही पाचपुते म्हणाले.नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला आमदार विक्रम पाचपुते यांनी हिरवा कंदील दाखवला आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे