Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगांव शाळेत ८० वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

0 8 6 5 3 0

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगांव शाळेत ८० वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

उक्कडगांव / प्रतिनिधी :बाबु तिपुळे

८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगांव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी गावामध्ये मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली . ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच नवनाथ म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शाळेत ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेऊन मुलांच्या कवायत घेण्यात आल्या . विविध स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या मुला मुलींच्या गुणवत्ता नुसार गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .यानंतर मुला मुलींचे भाषण घेण्यात आले .भाषण सभारंभ झाल्यानंतर गावातील काही सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यावतीने शाळेसाठी ठेव पावती करण्यात आली . यामध्ये सरपंच नवनाथ म्हस्के यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपये रोख रक्कम देऊन शाळेसाठी ठेव पावती करण्यात आली तसेच मा. सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी पाच हजार रुपये रोख रक्कम देऊन ठेव पावती करण्यात आली . अनेक ग्रामस्थांनी ठेव पावत्या केल्या .

या ठेव पावती मधील जे व्याज येते ते शाळेतील विद्यार्थ्यांना दर वर्षी १५ ऑगस्ट च्या निमित्ताने बक्षिस वितरण करण्यात येते असे अनेक प्रकारचे उपक्रम शाळेत राबविले जातात .

यावेळी शाळेच्या अध्यक्षस्थानी दादा महाराज शेळके होते .
तसेच उपस्थित मान्यवर सरपंच नवनाथ म्हस्के मा . सरपंच बाळासाहेब म्हस्के सावंत गुरुजी बाळु पाटील म्हस्के शाळेचे मुख्याध्यापक गणपत दसपुते सर जम्बे मॅडम साठे मॅडम खर्से मॅडम पादीर मॅडम व गावचे मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्था मान्यवर मंडळी होते . यावेळी कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापक श्री गणपत दसपुते सर यांनी केली . व सर्व मान्यवर व्यक्ती ,ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे  आभार मानले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे