Breaking
ब्रेकिंग

सजावटीतून संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर मिलाफ : उपवनसंवरक्षक सालविठ्ठल

स्नेहबंध'तर्फे गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६ चे ५ विजेते सन्मानित

0 8 9 6 7 3

सजावटीतून संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर मिलाफ : उपवनसंवरक्षक सालविठ्ठल

 

‘स्नेहबंध’तर्फे गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६ चे ५ विजेते सन्मानित

 

अहिल्यानगर -पारंपरिक संस्कृतीचे जतन करतानाच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारी गौरी-गणपती सजावट महिलांच्या कलागुणांना वाव देणारे प्रभावी माध्यम ठरली आहे. महिलांनी आपल्या कलात्मकतेतून व कल्पकतेतून संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे, असे गौरवोद्गार उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी काढले.

स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, प्रायोजक -भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, शिल्पा भंडारी, नेहा मुंगी, जान्हवी मुंगी उपस्थित होते. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल साई-श्रद्धा फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परकाळे, समाजसेविका ज्योत्स्ना मुंगी, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ. संजय वायकर, माजी प्राचार्य एकनाथ जगताप आणि साई ट्रॉफीजचे संचालक सचिन पेंडुरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात विजेत्या महिलांना पैठणी साडी, ट्रॉफी, वृक्ष, डायरी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. परिचय व आभार प्रदर्शन माजी प्राचार्य एकनाथ जगताप यांनी केले.

सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा मानस : डॉ. उद्धव शिंदे

गौरी-गणपती सजावट ही केवळ धार्मिक परंपरा न राहता महिलांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा स्नेहबंधचा मुख्य प्रयत्न आहे. महिलांचा दरवर्षी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले.

 

 अंतिम निकाल असा 

 प्रथम : प्रमिला रोकडे

 द्वितीय : सुचिता बिडवाई / रुपाली बिडवाई

तृतीय : निलम परदेशी

उत्तेजनार्थ: संगीता गलांडे, वत्सला गावडे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे