Breaking
ब्रेकिंग

रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करावी – – कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिलाष घिगे व भाजपा तालुका अध्यक्ष दादासाहेब दरेकर

0 8 6 5 2 3

रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करावी – –
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिलाष घिगे व भाजपा तालुका अध्यक्ष दादासाहेब दरेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी …

प्रतिनिधी : संजय भापकर

अहिल्यानगर:- वाळकी गटातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असून सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खड्ड्यांनी भरून निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व नगर तालुका भाजपा अध्यक्ष दादासाहेब दरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.

रुई ते हातवळण रस्ता, आरणगाव – वाळकी – राळेगण रस्ता, बाबुर्डी बेंद ते देऊळगाव सिद्धी तसेच आबिलवाडी गावठाण परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दररोज या मार्गांवरून शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच सामान्य नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. अनेक ठिकाणी खोल खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

या अन्यायी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून खड्डे बुजवावेत व रस्ते कित्येक ठिकाणी नव्याने दुरुस्त करावेत, अशी जोरदार मागणी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व दैनंदिन वाहतुकीसाठी संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे