Breaking
ब्रेकिंग

गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करा; मशिदींवरील भोंगे काढा – – या मागणीसाठी उपोषण

मढी व तिसगाव येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले

0 4 3 3 3 1

गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करा; मशिदींवरील भोंगे काढा – – या मागणीसाठी उपोषण

कारवाई सुरु करताच स्थगित करण्यात आले

मढी व तिसगाव येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले

विशेष प्रतिनिधी : महेश कांबळे

नगर -नगर जिल्ह्यात सुरु असलेले गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करून बंद करावेत तसेच सर्व मशिदींवरील भोंगे तात्काळ काढून टाकावेत यासाठीगेली ३ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते या उपोषणात कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, मढीचे सरपंच संजय मरकड,कालिदास महाराज घोडके,सुंदरनाथ महाराज,कानिफनाथ आखाडा, सुथबीरनाथ महाराज, सुखवीरनाथ महाराज,सोपाननाथ महाराज,सोमनाथ महाराज,मच्छिंद्र वेताळ,रमेश मरकड हे उपोषणाला बसले होते
त्यांची भेट महाराष्ट्र राज्य समस्त गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष , प्रखर हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी भेट देऊन चर्चा केलीनंतर त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते व डीसीपी संदीप खैरे यांच्याशी चर्चा केली व सध्या रोज कत्तलीसाठी जाणारे गोधन पकडले जात असून रोज गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने वर कारवाई चालू आहे, यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत मशिदी वरील भोंगे काढत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे ठाम सांगितले, संध्याकाळी मढी व तिसगाव येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले .

यावेळी हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे,  उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते व डीसीपी संदीप खैरे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी चंद्रकांत जाधव,गौतम कराळे , संजय आडोळे ,गणेश कुसमोडे,दीपक महाराज काळे , अमोल बारस्कर नितीन उदमले आदी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे