Breaking
ब्रेकिंग

धोत्रे गावचा अभिमान महेश पाडेकर यांचा राज्यस्तरीय गौरव

0 7 6 9 4 1

धोत्रे गावचा अभिमान महेश पाडेकर यांचा राज्यस्तरीय गौरव

राहुरी तालुका जावेद शेख

“शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदान करणारा नव्हे, तर समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ असतो.” या विचाराला साजेसा मानाचा गौरव अलीकडेच धोत्रे गावच्या सुपुत्रांना प्राप्त झाला. श्री. महेश विष्णू पाडेकर यांना सलग चार प्रतिष्ठित पुरस्कार मिळून त्यांचा राज्यस्तरीय सन्मान झाला असून, या अभिमानामुळे संपूर्ण धोत्रे गाव उजळून निघाले आहे.

गावचे सरपंच प्रदीप चव्हाण, उपसरपंच भाऊसाहेब गागरे, माजी सरपंच विष्णू पाडेकर, चेअरमन किरण चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष पवन चव्हाण, तसेच सागर गवारे, बाळासाहेब जामदार, महिंद्र आगवन, शेषराव शिंदे, ज्ञानदेव चव्हाण, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब वैद्य, संजय अण्णासाहेब जामदार, शरद शिंदे आदी मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री. पाडेकरांचा गावात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री. पाडेकर यांना मिळालेले पुरस्कार :
गरुड फाउंडेशन व ग्रामीण युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार
जाणीव फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक रत्न पुरस्कार
अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले – “हा सन्मान फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण गावाचा अभिमान आहे. आमच्या गावातील शिक्षक राज्यपातळीवर नावाजले जात आहेत, ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे.”
सत्कार सोहळा उत्साहात पार पडला असून, पाडेकर यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ ठरावे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे