Breaking
ब्रेकिंग

कल्याण – अहिल्यानगर पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील वाहतुकीत तात्पुरता बदल

0 7 6 9 4 3

कल्याण – अहिल्यानगर पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील वाहतुकीत तात्पुरता बदल

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर शहरातील कल्याण अहिल्यानगर पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील सीना नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून पुलाच्या Super Structure साठी Girder Launching चे काम करण्यात येणार आहे. सदर काम दि. १६ मार्च २०२६ ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.

सदर कामासाठी पुलाजवळ मोठ्या आकाराचे गर्डर तयार करण्यात आले असून ते बसविण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेन व टूलेरचा वापर करण्यात येणार आहे. संबंधित रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असल्यामुळे कामकाजादरम्यान अपघात होण्याची किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अहिल्यानगर दौंड मार्गावरील कायनेटिक चौक ते अरणगाव बायपास या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ०८.०० वा. पासून ते दि. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ०८.०० वा. पर्यंत सीना नदी पुलाजवळील वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे.

१) नेप्ती नाका कडून कल्याण बायपासकडे जाणारी वाहतूक :

नेप्ती नाका सक्कर चौक कायनेटिक चौक रंगोली हॉटेल लिंक रोड मार्गे इच्छित स्थळी जावी. तसेच लहान वाहनांसाठी पर्यायी मार्ग नेप्ती नाका काटवन खंडोबा रोड मार्गे जावे.

२) कल्याण बायपासकडून नेप्ती नाक्याकडे येणारी वाहतूक : कल्याण बायपास लिंक रोड रंगोली हॉटेल (केडगाव) मार्गे इच्छित स्थळी जावी.

नागरिकांनी व वाहनचालकांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखा मार्फत करण्यात आले आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे