Breaking
ब्रेकिंग

अल्पवयीन मुलीची रामशेज किल्ल्यानजीक जंगलातून आरोपीच्या तावडीतून सुटका

0 8 6 6 6 4

अल्पवयीन मुलीची रामशेज किल्ल्यानजीक जंगलातून आरोपीच्या तावडीतून सुटका

मुख्य आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण यास व त्यास मदत करणारे दोन आरोपी कौसर हैदर पठाण ,व आकाश शरद संसारे असे एकूण तीन आरोपी अटकेत

राहुरी तालुका / जावेद शेख

ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या तब्बल 105 मुलींचा मागील दोन वर्षात शोध घेऊन पालकांच्या ताब्यात….

राहुरी तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलगी वय 15 वर्ष हिस दि.13/02/2026 रोजी सकाळी 09:00 वाजेच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे दाखल केल्याने सदर मुलीचा राहुरी पोलिस स्टेशन पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून पीडितेचा १८/०२/२०२६ रोजी रात्रीच्या वेळी नाशिक जिल्ह्यातील नाशिक सुरत रोड लगत रामशेज किल्ल्यानजीक जंगलातून शोध घेऊन आरोपीच्या ताब्यातून सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आले आहे .

सदर मुलगी कॉलेजला जात असताना आरोपी याने तिचे अपहरण करून पळवून नेऊन तीस नाशिक जिल्ह्यात जंगलात नेऊन पाच दिवस जंगलात ठेवून अत्याचार केल्या प्रकरणी पीडेतेच्या जबाबावरून पॉस्को व लैंगिक अत्याचार कलम वाढ करून तपास सुरू आहे.
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पोसई गणेश वाघमारे,पो कॉ इफ्तेखार सय्यद, पो. कॉ./ चांद भाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख यांनी केले आहे व तपासात सहाय्य पोसई राजु जाधव, पोहेकॉ / राहुल यादव , पोहेकॉ. सुरज गायकवाड, पोहेकॉ विकास साळवे, गणेश लिपने,सचिन ताजने, म.पो.हे.कॉ / कोहकडे मपोकॉ. वंदना पवार, यांनी केले आहे .सदर गुन्हयाचा तपास पो. स. ई . गणेश वाघमारे व रायटर पो. कॉ इफ्तेखार सय्यद हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे