Breaking
ब्रेकिंग

ऐतिहासिक भुईकोट किल्ला अनमोल ठेवा, त्याचे जतन, संवर्धन व्हावे : डॉ. उद्धव शिंदे

एम के सी एल मार्फत किल्ल्यात स्वच्छता मोहीम

0 3 9 0 4 2

ऐतिहासिक भुईकोट किल्ला अनमोल
ठेवा, त्याचे जतन, संवर्धन व्हावे : डॉ. उद्धव शिंदे

एम के सी एल मार्फत किल्ल्यात स्वच्छता मोहीम

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर | शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला हा अनमोल ठेवा आहे, या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.

भुईकोट किल्ल्यात शहरातील एम के सी एल मार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण कॉम्पुटर्स इन्स्टिट्युटचे संचालक जालिंदर चौरे, आशा चौरे, ओंकार कॉम्पुटर्सचे संचालक अभिजीत भुतकर, शितल भुतकर, रोटरी क्लबचे सदस्य अमोल बास्कर, रवि राऊत उपस्थित होते. किल्ल्यातील वाढलेली झाडे-झुडपे तोडत बुरुजावर झालेले अतिक्रमण मोकळे करण्यात आले. बुरुजावर धूळ, भोवतीची वाढलेली झाडी दूर झाल्यामुळे गडाच्या बुरूजांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे किल्ल्याला भेट देण्यासाठी येणाऱ्यांना किल्ला व्यवस्थित पहाता येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत सुमारे ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी डॉ. शिंदे बोलत होते.

किल्ल्यात प्लास्टिकचा कचरा यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. त्याची दखल घेत एम के सी एल, श्रीकृष्ण व ओंकार कॉम्प्युटर्सचे संचालक व विद्यार्थ्यांनी किल्ल्याची स्वच्छता केली. बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, वेफर व बिस्किटांची पाकिटे व जुने कपडे इत्यादी कचरा जमा केला. त्यामुळे या किल्ला परिसराने मोकळा श्वास घेतला.
डॉ. शिंदे म्हणाले, किल्ल्यात व परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद व तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे किल्ल्यात अस्वच्छतेला आळा बसेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे