Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथील महादेव काशिनाथ चौधरी यांचे निधन..

0 7 9 8 9 9

गुंडेगाव येथील महादेव काशिनाथ चौधरी यांचे निधन..

वाळकी /   प्रतिनिधी 

गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मा.चेअरमन तसेच जगदंबा दुध डेअरी चेअरमन कै.महादेव काशिनाथ चौधरी (आप्पा ) वय ७५ यांचे गुरुवार दि.१८ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून गुंडेगावच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांनी यशस्वीपणे आपला दबदबा व पकड कायम ठेवली होती.ते हसतमुख स्वभाव आणि सर्वांशी जिव्हाळ्याने बोलणारे आप्पा म्हणून पंचक्रोशीत परिचित होते.त्यांच्या अंतिम विधीवेळी राजकीय मंडळी, नातेवाईक, व्यावसायिक सहकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, बहिण,मुले,तीन विवाहित मुली,सून व नातवंडे असा परिवार आहे.ते प्रगतशील शेतकरी साहेबराव चौधरी यांचे वडील होते.त्यांच्या निधनाने गुंडेगावच्या राजकीय,सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे