देहेन येथील बालसंस्कार शिबिरामध्ये बासरी रंग कार्यक्रम सादर

देहेन येथील बालसंस्कार शिबिरामध्ये बासरी रंग कार्यक्रम सादर
राजेश बाष्टे / अलिबाग प्रतिनिधी
संगीत सेवेबरोबरच विद्यार्थ्यांकडून अन्नदान सेवा..
देहेन येथे सुरु असलेल्या 15 दिवसीय बालसंस्कार शिबिरामध्ये सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमी कडून बासरी रंग कार्यक्रम सादर करण्यात आला..
सुरुवातीला सचिन धुमाळ यांनी बासरीवर राग यमन सादर केला . त्यानंतर सर्व विद्याथ्यांनी मिळून
ॐ नमः शिवाय, पायोजी मैने, अच्युतम केशवम, ॐ जय जगदीश हरे, अशी विविध भक्तीगीते सादर केली.
मानस धुमाळ याने देहाची तिजोरी, सूर्यकांत पाटील यांनी रुणूझुणु रुणूझुणु रे भ्रमरा, जान्हवी धुमाळ हिने देशप्रेमावरील तेरी मिट्टी मे मिल जावा अशी विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली..
या कार्यक्रमासाठी जयेंद्र पाटील, शार्दूल भगत, श्रीगणेश म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमानंतर अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांकडून शिबिरार्थी व उपस्थित श्रोते यांच्यासाठी अन्नदान सेवा करण्यात आली..
कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमितजी म्हात्रे, हभप उमेशजी शिंदे, आणि ग्रामस्थ व महिला मंडळ देहेन यांनी केले होते..