Breaking
ब्रेकिंग

चोरट्यानी घरातून कपाटच लांबवले ;  २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीस

0 4 3 3 3 2

चोरट्यानी घरातून कपाटच लांबवले ;  २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीस

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : घराबाहेर झोपलेल्या शिक्षकाच्या घरातील कपाटच लांबवून तिच्यातील २ लाख ७३ हजार रुपये व शेजारील घरातील ७ हजार रुपये अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना ३० रोजी मध्यरात्री तालुक्यातील खवशी येथे घडली.खवशी येथे शिक्षक असलेले सिद्धार्थ वसंत शिरसाठ याना त्यांच्या शेजारील सिद्धार्थ अशोक शिरसाठ यांचा १ रोजी पहाटे साडे चार वाजता फोन आला की मी बाहेर झोपलेलो आहे मला पाणी प्यायचे होते म्हणून घरात जाण्यासाठी दरवाजा उघडायला गेलो तर दरवाजा आतून बंद आहे. म्हणून दोघे जण त्यांच्या घराच्या मागच्या बाजूस गेले असता त्यांना दोघांच्या घराचे मागचे दरवाजे उघडे दिसले. सिद्धार्थ वसंत शिरसाठ यांच्या घरातील लोखंडी कपाटच गायब दिसले. कपाटात रोख रक्कम १ लाख ८० हजार रुपये , ४५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रामचे दोन सोन्याचे टोंगल , १५ हजार रुपयांचे ५ ग्राम वजनाचे दोन सोन्याचे काप , १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत , १२ हजार किमतीची चार ग्राम सोन्याची अंगठी , ३ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या कानातील बाह्या , ३ हजार रुपये किमतीची सोन्याची नथ असा एकूण २ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज होता. दोघांनी कपाट शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ते कपाट गणेश वसंत कापडे यांच्या शेतात उघडे पडलेले दिसले. कपाटातील ऐवज गायब होता. सिद्धार्थ अशोक शिरसाठ यांचेही सात हजार रुपये चोरीस गेले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला सिद्धार्थ वसंत शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३०५(अ),३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी डी वाय एस पी विनायक कोते , परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले ,हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. जळगावहून श्वान पथक , ठसे तज्ञ आणि डीवायएसपी कार्यालयातील फॉरेन्सिक प्रयोगशाळा कर्मचारी बोलावण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे