Breaking
ब्रेकिंग

शेटेवाडी येथे संक्रांतीचा वाण वाटप व महिला मेळावा संपन्न

0 8 6 6 6 2

शेटेवाडी येथे संक्रांतीचा वाण वाटप व महिला मेळावा संपन्न

वाळकी /  प्रतिनिधी : दादा आगळे

मांडवगण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शेटेवाडी येथे संक्रांती वाण वाटपानिमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.हळदी-कुंकू पारंपरिक संस्कृतीचे जतन करणारा सोहळा आहे. या कार्यक्रमाने महिला एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अशा कार्यक्रमातून महिला सशक्तीकरणाला दिशा मिळत असते. त्यामुळे महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी व सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत होते.
यावेळी उपस्थित महिलांना वाण वाटप करण्यात आले.तसेच निवृत्त मुख्याध्यापिका सौ.आशा शेटे-काकडे यांचा काव्य गायनाचा कार्यक्रम पार पडला.सामाजिक कार्यकर्त्या सौ.आरती लोखंडे यांनी स्री शिक्षण व महिलांचे आरोग्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना आई व शिक्षक हेच मुलांचे उज्वल भवितव्य घडवू शकतात असे सांगितले.यानिमित्ताने महिलांसाठी संगीतखुर्ची,मनोरा रचणे,प्रश्नमंजुषा इ स्पर्धांचे आयोजन करुन विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती भालसिंग,मिराताई शेटे,अश्विनी घोडके,योगिता शेटे यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे