अविरत समाज सेवेचा वसा घेतलेल डॉ. उद्धव शिंदे समाजासाठी एक आदर्श : सीईओ – मोरे
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचा गौरव.
अविरत समाज सेवेचा वसा घेतलेल डॉ. उद्धव शिंदे समाजासाठी एक आदर्श : सीईओ – मोरे
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचा गौरव.
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे हे समाजात प्रामाणिकपणे उजेड पसरवण्याचे कार्य करीत आहेत. ते समाजातील खरे हीरो आहेत. नि:स्वार्थ भावनेने समाज सेवा करत ते समाजात एक आदर्श निर्माण करीत आहेत, असे प्रतिपादन अहिल्यानगर छावणी परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.
समाजातील गरीब, वंचित, निराधार, कामगार, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणारे, तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिंदे यांचा अहिल्यानगर छावणी परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी सामाजिक कार्याबद्दल शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साई ट्रॉफीचे संचालक सचिन पेंडुरकर, सुनिल कानडे, सिमा कानडे, कीर्ती कानडे आदी उपस्थित होते.
स्नेहबंध फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. शिंदे हे गेल्या बारा वर्षांपासून समाजातील वंचित निराधार घटकांसाठी ब्लॅंकेट, छत्री व इतर जीवनावश्यक वस्तू पुरवतात, बांधकाम कामगारांना उन्हाळ्या त टोपी देतात, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध शिबिरे आयोजित करतात. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, त्यांना बसण्यासाठी चटई देतात. डॉ. शिंदे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत सीईओ विक्रांत मोरे यांनी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला .



