१२ वर्षीय विद्यार्थीनीवरच्या अॅसिड हल्याने सर्वत्र संताप;आरोपीचा शोध सुरु…
१२ वर्षीय विद्यार्थीनीवरच्या अॅसिड हल्याने सर्वत्र संताप;आरोपीचा शोध सुरु…
राहुरी तालुका जावेद शेख
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावात सहावीमध्ये शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर एका नराधमाने अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना काल मंगळवारी घडली. यामुळे जिल्ह्यासह सर्वत्र खळबळ उडाली असून विधानसभेतही ही घटना मांडल्यानंतर तत्काळ सरकारने गंभीर दखली घेतली आहे.
सदर विद्यार्थिनी सहावीत शिकत आहे.ती काल दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. त्याचवेळी गाडीवर एका नराधमाने येऊन जाधव कुठे राहतात? असे विचारत बाटलीचा वास घे असे म्हणत बाटलीतील अॅसिड मुलीच्या चेहऱ्यावर फेकत तिच्यावर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तो हल्लेखोर पळून गेला.
दरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे.तर आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.या संतापजनक घटनेचा सर्वत्र निषेध होत असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.


