उबाठाचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत दणदणीत प्रवेश*
*उबाठाचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत दणदणीत प्रवेश*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथील शिवसेनेत उबाठाचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच माजी उपनगराध्यक्ष डॉ राजेंद्र पिंगळे यांनी प्रवेश केला असून नामदार गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पाळधी येथे त्यांना शिवसेनेचा चिन्ह असलेला भगवा फटका देऊन त्यांचे स्वागत केले.नूतन तालुका प्रमुख व शहर प्रमुख यांचे सोबत अमळनेर तालुक्यातील शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत म्हणून शुभेच्छा दिल्यात.तसेच शिवसेनेचे अमळनेर तालुका संपर्क पालक आमदार दादासाहेब अमोल चिमणराव पाटील यांनीही सदिच्छा दिल्यात. डॉ राजेंद्र पिंगळे हे मितभाषी असून त्यांचा अमळनेर तालुक्यात जनसंपर्क असून त्यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेना वाढीसाठी फायदाच होणार आहे असे नूतन तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी म्हटले असून त्याचे स्वागत केले आहे.भविष्यात असे अनेक शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहेत व शिवसेना भगवामय केल्याशिवाय राहणार नाही.
सदर प्रसंगी नूतन तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील,शहर प्रमुख संजय पाटील,सामाजिक कार्यकर्ते ,नगरसेवक विक्रांत पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख रोहित कोगटा ,उद्योगसेनेचे अमित ललवाणी उपस्थित होते.



