Breaking
ब्रेकिंग

न्यु लॉ कॉलेजच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

0 7 6 9 3 7

न्यु लॉ कॉलेजच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यु लॉ कॉलेज अहिल्यानगर यांच्या वतीने दि . १९ फेब्रुवारी रोजी प्राचार्य एम एम तांबे यांच्या मार्गदर्शनाने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविदयालयाने “स्वराज्याची शपथ ” या थीम प्रमाणे देखावा सादर केला व झांज पथकाचे सुंदर आयोजन केले. झांज पथकात एकुण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन मिरवणुकीची सुरुवात झाली व कापडबाजार मार्गे न्यू लॉ कॉलेज येथे मिरवणूक पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटात उत्साहात वाजत गाजत नेण्यात आली .

महाविद्‌यालयाचे प्राचार्य डॉ. तांबे यांचे मार्गदर्शन केले तसेच प्रा. अतुल मोरे, प्रा. रामेश्वर दुसुंगे व प्रा. सुनिल जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. शिवजयंतीसाठी महाविदयालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहकार्य केले .

या शिवजयंती उत्सव आयोजनाचे व झांज पथकाचे कौतुक अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष श्री रामचंद्र दरे, सेक्रेटरी • अँड विश्वासराव आठरे , सहसेक्रेटरी मुकेश दादा सुळे, उपाध्यक्ष डॉ . विवेक भापकर व खजिनदार अॅड. दिपलक्ष्मी म्हसे यांनी केले व संस्थेचे इतरही पदाधिकारी यांनी कौतुक केले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे