कळवण तालुक्यातील महिलांसाठी एक दिवसीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कळवण तालुक्यातील महिलांसाठी एक दिवसीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी :- पंकज पाटील
कळवण :- राज्य पाणी व स्वच्छता मिशन ,( SWSM ), मुंबई ,जल जीवन मिशन , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था ( KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय 2024-25 या अर्थिक वर्षात महसूल गावातील एक महिला या प्रमाणे पाणी गुणवत्ता विषयक माहीती व प्रात्यक्षिक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात गावातील निवडलेल्या पैकी एक महिला प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण प्रसंगी विषय तंज्ञ साधन व्यक्ती यांच्याकडुन सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यामध्ये सर्व महिलांनी पाणी कशाप्रकारे चेक करावे हे सर्व पध्दतीने प्रशिक्षण अतिशय चांगले पध्दतीने जीएसडीए चे पाणी गुणवत्ता तालुका अधिकारी यांच्याकडुन प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण दरम्यान राष्ट्रविकास संस्थेमार्फत प्रफुल्ल शिरोडे यांनी सविस्तर प्रशिक्षण देऊन महिलांचे निरसन करण्यात आले त्या नंतर सदर महिला आपाआपल्या गावातील पाणी नमुने घरोघरी जाऊन चेक करावे असे नियोजन देखील करण्यात आले आहे .
सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र , देखील प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आले तसेच मार्गदर्शन देखील केले त्या प्रसंगी KRC राष्ट्रविकास संस्थेचे प्रशिक्षक व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते .