प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होणे गरजेचे अरुण भांगरे
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अकोले महाविद्यालयात उत्साहात संपन्न*

प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होणे गरजेचे अरुण भांगरे
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अकोले महाविद्यालयात उत्साहात संपन्न
राहुरी / विशेष प्रतिनिधी : जावेद शेख
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण हे शिक्षकांना अतिशय तळमळीने तज्ञ सुलभकांच्या मदतीने दिले जाते या प्रशिक्षणासाठी गेली तीन महिन्यापासून अविरत तयारी सुरू होती, हे प्रशिक्षण घेऊन त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणे गरजेचे आहे तो नक्की होईल अशी माझी अपेक्षा सर्व प्रशिक्षणार्थी कडून आहे असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा प्रशिक्षण समन्वयक अरुण भांगरे यांनी प्रशिक्षण समारोप प्रसंगी मत व्यक्त केले.
अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथे अकोले तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील १२ व २४ वर्षे सेवा झालेले सर्व शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले होते यामध्ये विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार केला होता तो १० दिवसात शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तज्ञ सुलभकांनी केले अभ्यासक्रमात राष्ट्रीय शिक्षण धोरण, मूल्यांची रुजवणूक, भारतीय ज्ञान प्रणाली, शालेय संस्कृती, शाळा मूल्यांकन आराखडा, शालेय अभिलेख हे व शासकीय योजना, शैक्षणिक संशोधन, अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोन, मूल्यमापन पद्धती, पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन, शिक्षणाचे ऑनलाइन स्रोत, सामाजिक आणि भावनिक शिक्षण, शिक्षक स्व विकासन व सक्षमीकरण, तान तणावाचे व्यवस्थापन, नेतृत्व विकास व प्रशासन, सेवा हमी कायदा आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन तज्ञ सुलभक शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे,महेश पाडेकर, चंद्रशेखर हासे, दीपक पाचपुते, सचिन वाकचौरे, अरविंद सगभोर, संतोष वाकचौरे, भाऊसाहेब पुरी, दीपक लोंढे, संदीप कोते, हरिबा चौधरी, भरत लोहकरे, मारुती बांडे, मनीषा रांधवन आदी तज्ञ सुलभकांनी केले प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण भांगरे होते यावेळी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी हासे, केंद्रप्रमुख भांगरे,ज्ञानेश्वर लाड, सीमा कानवडे आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाने १० दिवस प्रशिक्षण स्थळ उपस्थित करून सर्व प्रकारचे सहकार्य केल्यामुळे प्राचार्य भास्कर शेळके, उपप्राचार्य चांगदेव डोंगरे, प्रबंधक सिताराम बगाड यांचा सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जिल्हा व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश बनकर, अरुण भांगरे, कैलास सदगीर आदी अधिकारी यांनी परिश्रम घेऊन संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण यशस्वी पार पाडले समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काळे तर आभार गायकवाड यांनी मानले.