Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर शहरामध्ये ड्राय डे च्या दिवशी मदय विक्री करणाऱ्या परमीटधारक हॉटेलवर कोतवाली पोलीसांची कारवाई;

मदयविक्री परवाना झाला रद्द..

0 3 9 0 2 1

अहिल्यानगर शहरामध्ये ड्राय डे च्या दिवशी मदय विक्री करणाऱ्या परमीटधारक हॉटेलवर कोतवाली पोलीसांची कारवाई;

मदयविक्री परवाना झाला रद्द..

एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा

दि. ०६/१२/२०२४ रोजी डायल ११२ च्या मशिनवर माहिती मिळाली की, मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी दि. ०६/१२/२०२४ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमीत्त दारु विक्रीस बंदी असल्याने कोरडा दिवस घोषित केलेला असुनही अहिल्यानगर शहरामध्ये निमंत्रण हॉटेल एफएल-३ अ.क्र. ६२८. न्यू टिळकरोड, अहिल्यानगर येथे काही इसम मदय प्राशन करीत आहेत व त्यास सदर अनुज्ञप्तीचे नोकरनामधारक मालकाचे संमतीने मदय पुरवित आहेत अशी माहिती मिळाली होती.

त्यानंतर सदर डायल ११२ ची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांना समजताच त्यांनी तात्काळ अधीक्षक सो. राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर यांना कळवले व कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे मसपोनि योगिता कोकाटे व इतर पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणी जावून खात्री करुन योग्य ती कारवाई करा असा आदेश दिल्याने कोतवाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकातील सपोनि योगिता कोकाटे व पोलीस अंमलदार तेथे गेले असता निमंत्रण हॉटेल, न्यु टिळकरोड, अहिल्यानगर येथे काही इसम हे मदयाचे सेवन करत होते व त्यावेळी हॉटेल मालक चालक हे त्यांना मदय पुरवित असल्याचे निदर्शनास आले. त्याच वेळी प्र. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क हे त्यांच्या स्टाफ व पंचासह तेथे आले व मसपोनि कोकाटे यांनी मदय विक्री सुरु असलेबाबत दाखविले असता सदर बातमीतील हकिगत ही खरी असल्याने प्र. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांनी तात्काळ पंचासमक्ष सदर ठिकाणी पंचनामा केले असता निमंत्रण हॉटेल एफएल-३ अ.क्र. ६२८, न्यु टिळकरोड, अहिल्यानगर च्या ठिकाणी नियमावलीनुसार काही त्रुटी आढळुन आल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या कोरडया दिवसाचे उल्लंघन, मुंबई विदेशी मदय नियम १९५३ चे नियम ५९ तसेच अनुज्ञप्ती परवाना शर्त क्र. ९ व सवेल ऑन कॅश रजिस्टर नियम १९६९ मधिल नियम १५(१) चे उल्लंघन केले असल्याने सदर हॉटेल मालकाविरुद्ध रितसर गुन्हा नोंद केला असून सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रतिनिधी यांना जागीच दोषारोप पत्र देण्यात आले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांनी वेळोवेळी सदर गुन्हया संदर्भात राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांचेकडे पाठपुरवठा केल्याने मा. जिल्हाधिकारी सो. अहिल्यानगर यांचे आदेशान्वये दि. २१/०१/२०२५ रोजी निमंत्रण हॉटेल, न्यु टिळकरोड, अहिल्यानगर याचा एफएल-३ अ.क्र. ६२८ हा परवाना रद्द करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सोो, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / प्रताप दराडे, प्र. दुव्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर व गुन्हे शोध पथकाचे मसपोनि योगिता कोकाटे, पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, संदिप पितळे, सलीम शेख, विशाल दळवी, पोकों / दिपक रोहकले, अभय कदम, सतिष शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, तानाजी पवार, सुजय हिवाळे, सुरज कदम, सचिन लोळगे, विशाल कुलकर्णी, अनुप झाडबुके, राम हंडाळ, संकेत धिवर यांच्या पथकाने केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे