गुरुवर मुनिश्री १०८ प्रमाणसागरजी यांचे निर्देशानुसार भावनायोग प्रशिक्षक शिबिर श्री .शिरिष बेगडे यांनी केले पूर्ण
२१ जून रोजी भावनायोग सत्राचे आयोजन करणार - - शिरिषजी बेगडे

गुरुवर मुनिश्री १०८ प्रमाणसागरजी यांचे निर्देशानुसार भावनायोग प्रशिक्षक शिबिर श्री .शिरिष बेगडे यांनी केले पूर्ण
२१ जून रोजी भावनायोग सत्राचे आयोजन करणार – – शिरिष बेगडे
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
पुढील माहिती श्री .शिरिष बेगडे यांच्या शब्दांत …
*जय जिनेंद्र,* 🙏🙏
भावनायोग प्रणेता, गुरुवर मुनिश्री १०८ प्रमाणसागरजी यांचे निर्देशानुसार *भावनायोग प्रशिक्षक करीताचे* भोपाळ येथे प्रशिक्षणाकरीता माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो.
मी गेली ०३ वर्षांपासुन भावनायोग साधना करत आहे, व वेळोवेळी गुरुदेवांशी संपर्कात आहे.
सदरच्या शिबीराला देश, विदेशातुन साधक आले होते, ज्या मध्ये डाॅक्टर्स, इंजिनिअर्स,अधिकारी, व्यावसाईक सहभागी होते.
*व्यक्तीच्या आंतरिक परिवर्तनाची साधना म्हणजे भावनायोग,जो संपुर्णत: जैन आगमाचे सिध्दांतावर आधारीत आहे.* त्याची मुलभूत तत्वे गुरुदेवांनी विशद केली आहे, त्याचा स्वानुभव शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे.
परंतु एक निश्चित सांगेन कि, *व्यक्तीला येणारे मानसिक तणाव, नैराश्य आदी समस्यांवर व सकारात्मक व्यक्तीमत्व परिवर्तनावर रामबाण इलाज आहे.*
भावनायोगाचा जगदव्यापी प्रसार होत आहें.
आपल्या या वैशिष्ठपूर्ण ग्रुप मधील काही सदस्य भावनायोग साधना करत असतील ही शंका माझ्या मनात नाही. परंतु भावनायोग संदर्भात गुरुदेवांकडुन मला मिळालेले ज्ञान आपणा सर्वांना देण्याची संधी मला मिळेल हि आशा करतो.
*विश्वभरात दि. २१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन साजरा केला जातो.*
*गुरुदेवांचे आदेशा नुसार आतंरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधुन शनिवार दि. २१/६/२५ रोजी श्री. महावीर दि. जैन मंदिर अहिल्यानगर येथे *”भावनायोग”* सत्राचे आयोजन करीत आहे.
सदर शिबिरात जास्तीत जास्त
श्रावकांनी सह परिवार सहभागी
व्हावे हि विनंती.
कृपया इच्छुकांनी माझे Whatsapp वैयक्तीकरित्या कळवावे, चर्चा करुन सर्वांना सोईची वेळ ठरविणे शक्य होइल.
आपला,
शिरीष भालचंद्र बेगडे
भावनायोग प्रशिक्षक. मो . नं . 99234 00981