Breaking
ब्रेकिंग

श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता. राजमाता माॅ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

महापुरुषांचे विचार कायम समाजाला प्रेरणा देतात - देविदास शर्मा

0 3 9 0 2 3

महापुरुषांचे विचार कायम समाजाला प्रेरणा देतात – देविदास शर्मा

श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता. राजमाता माॅ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

खामगाव / प्रतिनिधी

स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा आज दिं १२-१-२०२५ रविवार रोजी सकाळी ११ वा मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ संचालिका सौ पार्वती बाई सुकाळे यांच्या घरी राष्ट्रमाता. राजमाता माॅ जिजाऊ यांच्या प्रतिमेला व लोक माता पुण्यश्लोक देवी श्रीअहिल्यादेवी होळकर,ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कुंकुम तिलक लावून.पुष्पहार अर्पण करून विधिवत पुजन करून माॅ जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले
या वेळी बुध्दी आणि युक्ती च्या जोरावर माॅ साहेब जिजाऊंनी अशक्य ते शक्य करून दाखविले स्वराज्य निर्माण केले. स्वामी विवेकानंदानी ध्येय पुर्ती होईपर्यंत थांबु नका असा संदेश दिला महापुरुषांचे विचार व कार्य समाजाला कायम प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांनी केले राजमाता माॅ जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या वेळी ते बोलत होते . जिजाऊ वंदना घेऊन अल्पोपहार ,चहा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या प्रसंगी जेष्ठ साहेबराव सुकाळे, महादेवसर सुकाळे, भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा,विनोद सुकाळे, आशाबाई अंधारे, सुशिला आवलकर,पार्वतीबाई सुकाळे,मंगला बावस्कर, शकुंतला ढवळे,जयाबाई सुकाळे, जयश्री झापर्डे, रजनी सुकाळे, आरती सुकाळे,मंजरी सुकाळे, भक्ती सुकाळे, धनश्री सुकाळे, भुमी सुकाळे, स्वाती ठोसर, गुंजा ठोंबरे, संध्या ठोंबरे, सिध्दिका निवल,लाडो यादव, आशा इटनारे, पुजा इटनारे, प्रिया यादव, आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद सुकाळे यांनी केले अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे