राहुरीचे गटविकास अधिकारी 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात ; अहिल्यानगर लाचलूचपतच्या पथकाचा यशस्वी सापळा

राहुरीचे गटविकास अधिकारी 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात ; अहिल्यानगर लाचलूचपतच्या पथकाचा यशस्वी सापळा
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग 1) सुधाकर श्रीरंग मुंडे (वय 57, रा. प्लॉट नं. 68, 69, केशव कुंज रोड, श्रीराम चौक, ऐश्वर्या नगरी, अहिल्यानगर) यांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अहिल्यानगर युनिट) पथकाने २० जून २०२५ रोजी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार (वय ५८, जिल्हा अहिल्यानगर) हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्या सेवेत असताना त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून निलंबनाची कारवाई झाली होती. सेवानिवृत्तीनंतर दोषारोप पत्राचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. आरोपीने तक्रारदाराकडून ही रक्कम स्वतः स्वीकारली.
या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सापळा कारवाई दरम्यान हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी:
👉 श्रीमती छाया देवरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., अहिल्यानगर – 8788215086
👉 अजित त्रिपुटे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., अहिल्यानगर – 8329701344
सापळा पथक:
पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, ड्रायव्हर अरुण शेख
मार्गदर्शन:
मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र – 9371957391