Breaking
ब्रेकिंग

राहुरी येथील आठवडे बाजारातून मोबाईल चोरणाऱ्या टोळीस राहुरी पोलिसांनी केले जेरबद

पोलीस कस्टडी दरम्यान चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत

0 3 9 0 3 6

राहुरी येथील आठवडे बाजारातून मोबाईल चोरणाऱ्या टोळीस राहुरी पोलिसांनी केले जेरबद

पोलीस कस्टडी दरम्यान चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत

राहुरी प्रतिनिधी /   जावेद शेख

राहुरी आठवडे बाजारात राहुरी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना ओमकार नंदू शिंदेवय 18 रा- बीड याला चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोरताना रंगेहात पकडले तर त्याचा दुसरा साथीदार तेथून पसार झाला होता . दि . 12/12/2024 रोजी भाऊसाहेब कारभारी तमनर रा- तमनर आखाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरीपोलीस स्टेशन गु र नं-1276/2024 बीएनएस कलम- 309(4)112(2)प्रमाणे जबरी चोरी चा गुन्हा सदर आरोपी विरुद्ध दाखल झाला होता.
दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीची गोपनीय बातमीदारा मार्फत काढून फरार आरोपी  तुकाराम अशोक पांचाळ वय-33 रा- बीड हा पळून जाण्याच्या तयारीत असताना राहुरी बस स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपासात कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना 12/12/2024 रोजी अटक केली असून, मा.न्यायालयात हजर केले असता 4 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे .

पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियुक्त श्री रविंद्र गागरे यांनी बाजू मांडली.रिमांड कालावधीमध्ये *चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे*.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहील्या नगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहील्या नगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहील्या नगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहील्या नगर यांनी केलेली आहे. संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन जि.अ. नगर

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे