Breaking
ब्रेकिंग

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

0 4 3 3 2 5

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

चोपडा :- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, तसेच उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील उपस्थित होते. शाळेतील क्रिडा शिक्षक जीवन पाटील आणि शाळेतील शिक्षिका शिवानी अहिरे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आसनांबद्दल प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती सांगितली. प्राणायाम विषयी सविस्तर माहिती सांगितली आणि प्रात्यक्षिक सादर केले. सर्व विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका ममता न्याती आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी देशमुख यांनी केले. योग दिनानिमित्त शाळेतील कला शिक्षक शकिल अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले.

दिनांक 20 जून रोजी चोपडा शहर परिसरात इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी योगा अवेअरनेस रॅलीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे