Breaking
ब्रेकिंग

रूपांतरित साठवण तलाव कामाच्या दर्जाकडे लक्ष द्या:- सरपंच रवींद्र वळेकर यांच्या ठेकेदारांना सूचना

0 3 9 0 4 0

रूपांतरित साठवण तलाव कामाच्या दर्जाकडे लक्ष द्या:- सरपंच रवींद्र वळेकर यांच्या ठेकेदारांना सूचना

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ करमाळा तालुक्यातील लव्हे व निंभोरे या दोन गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच 500 हेक्टर शेती क्षेत्र अवलंबून असलेल्या विठोबा या पाझर तलावाचे रूपांतरीत साठवण तलाव करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी 7 कोटी 97 लाख निधी मंजूर केलेला होता. सदर कामाचा कार्यारंभ आदेश 5 सप्टेंबर 2024 रोजी निघालेला होता. परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व पुढे आचारसंहिता लागल्यामुळे हे काम रेंगाळले होते. अखेर या कामास प्रारंभ झाला असून या कामाच्या दर्जाकडे लक्ष द्या अशा सूचना निंभोरे गावचे सरपंच रवींद्र वळेकर तसेच लव्हे गावचे युवा नेते माणिक पाटील यांनी ठेकेदारांना दिल्या आहेत.

लव्हे गावचे पंचायत समितीचे माजी सदस्य विलासदादा पाटील, रामभाऊ कवडे, शहाजी कोंडलकर तसेच निंभोरे गावचे सरपंच रविंद्र वळेकर, दत्ताभाऊ वळेकर, प्रविण वळेकर, इश्वर मस्के, नाथाभाऊ शिंदे, अक्षय वळेकर, संतोष पाटील, अण्णा सावंत, दिपक गवळी, विकास वळेकर यांच्या मागणीनुसार मा. आ. शिंदे यांनी हे काम मंजूर केले होते. आज दिनांक 11 मार्च रोजी माणिक दादा पाटील व रविंद्र वळेकर यांनी मिनीनाथ शिंदे, अक्षय वळेकर इ. ग्रामस्थांसह कामाची पाहणी केली. या तलावामध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणीही सोडता येते. यापूर्वी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी चार वेळेस हा तलाव ओव्हरफ्लो केला होता. आता या तलावाचे साठवण तलावात रूपांतर होणार असल्यामुळे या तलावामध्ये अधिकचे पाणी बसणार आहे त्याचा फायदा लव्हे व निंभोरे गावातील 500 हेक्टर क्षेत्रासाठी होणार आहे. तसेच याच तलावाच्या क्षेत्रामध्ये निंभोरे या गावची पाणीपुरवठा योजना येत आहे त्यामुळे कामाच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची ही अपेक्षा आहे.

श्री वरदसिद्धि कन्स्ट्रक्शन कं., इरिगेशन कॉलनी, कुर्डुवाडी रोड, टेभुर्णी, ता. माढा जि. सोलापुर.
हे या कामाचे मूळ ठेकेदार आहेत तर श्री दत्त कन्स्ट्रक्शन, प्रो. प्रा. प्रमोद ब्र. मोरे, मिरा नगर, जुळे सोलापूर जि. सोलापूर हे उप ठेकेदार आहेत ‌या दोघांवर ती या कामाचा दर्जा राखण्याची जबाबदारी आहे. मा. व्यवस्थापकिय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांचे पत्र जा.क्रं. मजसंम/तां.शा.-५/पुणे मंडळ/२४६२/सन २०२४ या आदेशान्वये दि.०९/०८/२०२४ रोजी ७ कोटी २४ लाख १० हजार ५६ या निधीचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे